पाहा व्हीडिओ : हे 5 प्राणी अखेरचे पाहून घ्या कारण...

पाहा व्हीडिओ : हे 5 प्राणी अखेरचे पाहून घ्या कारण...

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले हे प्राणी ओळखीचे वाटत आहेत का? ते मोजकेच उरलेत आता!

जगातला सगळ्यांत मोठा उभयचर प्राणी चीनमध्ये आहे आणि तो जवळजवळ नामशेष होत आला आहे. तशीच गत आणखी पाच प्राण्यांच्या प्रजातींची होणार आहे.

अमूर बिबळ्या, काळा गेंडा, बोर्निअन ओरँगउटान, क्रॉस रिव्हर गोरिला, सुमात्रन हत्ती हे प्राणीही मोजकेच शिल्लक राहिले आहेत.

संवर्धकांच्या मते, जगातल्या वन्य प्राण्यांची संख्या 1970च्या तुलनेत 58% कमी झाली आहे.

शिकार, तस्करी आणि अधिवास नष्ट होणं ही या प्राण्यांच्या नामशेष होण्यामागची मुख्य कारणं आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)