पाहा व्हीडिओ : ...तर सुटीच्या दिवशी जास्त झोपा आणि आयुष्य वाढवा!

पाहा व्हीडिओ : ...तर सुटीच्या दिवशी जास्त झोपा आणि आयुष्य वाढवा!

आठवडाभर नीट झोप होत नसेल तर सुटीच्या दिवशी जास्त झोपा आणि आयुष्य वाढवा! हे संशोधनात दिसून आलं आहे.

रात्री 5 तासांपेक्षा कमी वेळ झोपणाऱ्यांचा मृत्युदर हा 7 तास झोप घेणाऱ्या लोकांपेक्षा 65% जास्त असतो.

त्यामुळं आठवडाभर व्यवस्थित झोप होत नसेल तर सुटीच्या दिवशी निवांत झोपणं कधीही चांगलं.

स्वीडनच्या कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटनं सलग 13 वर्षं 43 हजारहून जास्त लोकांच्या झोपेचा अभ्यास केला.

तर मग सुटीच्या दिवशी निवांत ताणून द्यायला मागंपुढं बघू नका!

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)