येमेन : लग्नमंडपावर हवाई हल्ला झाला अन् त्यानं बाप गमावला - पाहा व्हीडिओ

येमेनमध्ये महिन्याभरापूर्वी एका लग्न समारंभात सौदीचा हवाई हल्ला झाला. लग्न समारंभासाठी 150हून अधिक लोक जमले होते. तिथे ड्रम वाजवून चरितार्थ चालवणारे समीहचे वडील अली हजर होते.

या हल्ल्यात त्यांचाही बळी गेला. समीह वडिलांच्या मृतदेहाशेजारी रडत होता.

समीह आता अनाथ झालाय.

अशा अनेक अनाथांची संख्या येमेनच्या संघर्षात वाढत आहे. चार वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धात 10,000हून जास्त लोक मारले गेले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)