पाहा व्हीडिओ - पाळीदरम्यान मुलींची शाळेत गैरहजेरी कशी कमी करायची?
पाहा व्हीडिओ - पाळीदरम्यान मुलींची शाळेत गैरहजेरी कशी कमी करायची?
शाळेतील मुलींना पाळीच्या वेळी त्रास होतो. त्यांचं अवघडलेपण घालवण्यासाठी 'पीरियड पॉवर' ही संस्था काम करत आहे. 28 मे या मेन्स्ट्रुअल हायजिन डेच्या निमित्ताने हा उपक्रम बघा.
ही संस्था मुलींना सॅनेटरी पॅड पुरवण्याचं काम करते. या संस्थेच्या पुढाकाराने आता मुली पाळीच्या विषयावर मोकळेपणानं बोलायला लागल्या आहेत.
पाळीच्या वेळी मुलींच्या गैरहजेरीचं प्रमाण वाढतं. ते कमी करायचं असेल तर त्यांचा आत्मविश्वास वाढवायला हवा आणि त्यांना आवश्यक त्या सोयी देण्यात यावा, असं या संस्थेला वाटतं.
पाळीबद्दल मुलींना उत्सुकता असते. त्या गुगलवरही याबाबत सर्च करतात. "मला एकटीलाच पाळी येत नाही, हे मला गुगलमुळेच कळलं," असं एक विद्यार्थिनी म्हणते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)