युरोपातील या लोकांना लागली आहे माहेरची आस
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ: शेकडो स्थलांतरित युरोप सोडून सीरियाला का परतत आहेत?

एकेकाळी सीरियाचे नागरिक आपल्या मायदेशातल्या संघर्षातून जीव वाचवून युरोपात शिरण्याचा प्रयत्न करत होते. 2017 साली या स्थलांतरितांचं काय करावं, असा मोठा प्रश्न युरोपियन देशांसमोर उभा ठाकला होता.

पण आता सीरियाच्या बऱ्याच भागातील तणाव कमी झाल्याची चिन्हं दिसू लागल्यानं आता ही मंडळी स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. आणि त्यासाठी युरोपच्या सीमेवर त्यांची गर्दी झाली आहे.

युरोपातील लोक आम्हाला रोखून बघतात, आमच्याकडे कट्टरवादी म्हणून बघतात, असा सीरियाच्या लोकांचा आरोप आहे. अशा अनेक कारणांमुळे त्यांना आता या देशांमध्ये परकं वाटू लागलं आहे.

पण आपल्या देशात परतण्याच्या वाटा या लोकांसाठी खरंच इतक्या सोप्या आहेत का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)