साधं शॉपिंगसाठी लोक हा धोका पत्करतात
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

साधं दुकानात जायलाही इथे करावी लागते तारेवरची कसरत

चीनच्या युनान प्रांतातील तीसहून अधिक गावांमधल्या लोकांना कुठल्याही कामासाठी नू नदी ओंलाडावी लागते. सर्वांत जवळचा पूल हा तासाभराच्या अंतरावर असल्यानं लोकांना मग साधा चहा आणायलाही झिपलाईनवर-तारेवरच्या वाहतुकीवर अवलंबून रहावं लागतं.

अनेकदा या भागातील लोकांना हा धोका पत्कारावा लागतो. काही वेळेस लहान मुलंही त्यांच्याबरोबर असतात. अगदी बाजारपेठेत जायचं असेल किंवा दवाखान्यात जायचं असेल तर ही तारेवरची कसरत ठरलेलीच.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)