पाहा व्हीडिओ : ...अन् मातीशिवाय फक्त कचऱ्यातून बाग फुलली

पाहा व्हीडिओ : ...अन् मातीशिवाय फक्त कचऱ्यातून बाग फुलली

मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये कचऱ्याची समस्या भीषण बनली आहे. यावर काय उपाय शोधावा हा सर्वांसमोरील मोठा प्रश्न आहे. मात्र कल्याणमधील श्रीनिवास घाणेकर यांनी यावर एक उपाय शोधला आहे.

घाणेकरांकडे एक मिश्रण आहे, जे जैविक कचऱ्यावर फवारलं असता, १५ दिवसांत त्या जैविक कचऱ्याचं विघटन होऊन केवळ २० टक्के काडीकचरा शिल्लक राहातो. त्यांनी या प्रयोगाचं प्रात्यक्षिक करण्यासाठी आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवर एक बगीचा लावला आहे.

घाणेकरांनी एक मिश्रण बनवलं आहे. जे जैविक कचऱ्यावर फवारलं असता, १५ दिवसांत त्या जैविक कचऱ्याचं विघटन होऊन केवळ २० टक्के काडीकचरा शिल्लक राहातो. त्यांनी या प्रयोगाचं प्रात्यक्षिक करण्यासाठी आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवर एक बागिचा लावला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)