'देवबाभळीमध्ये आवलीपासून ते रखुमाईपर्यंतचा हा उत्क्रांतीवाद आहे'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'तू शेवटचं कधी भिजली व्हतीस पावसात?' रखुमाईचा आवलीला प्रश्न

'संगीत देवबाभळी' या नव्या नाटकात संगीताबरोबरच स्त्रीवादी दृष्टिकोनही मांडला आहे. संत तुकारामांच्या पत्नी आवली आणि मनुष्यरूप घेऊन आलेल्या रुक्मिणी या दोघींमधला हा संवाद आहे.

संगीत नाटकाची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. पण जुन्याच पठडीत प्रयोग अडकून बसल्यानं ही परंपरा संपते आहे का, अशी चर्चा कायम होत असते. पण 'संगीत देवबाभळी' या नव्या नाटकानं सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे. या नाटकातल्या संगीताबरोबरच त्यातल्या स्त्रीवादी दृष्टिकोनाचीही चर्चा होते आहे.

आवली आणि रुक्मिणी रंगमंचावर प्रत्यक्ष गातात. आनंद भाटे यांनी गायलेले संत तुकारामांचे अभंगही या प्रयोगात आहेत.

"आवलीपासून ते रखुमाईपर्यंतचा हा उत्क्रांतीवाद आहे. म्हणजे आवली आहे जशी आपली आजी होती. की संपूर्ण आजोबा किंवा तुकाराममय असलेली बाई. ते रुक्मिणी, जी आताची माझी मैत्रिण, की जिला माहिती आहे की मी कोण आहे, मला काय आवडतं, माझं सुख कशात आहे," असं रुक्मिणीची भूमिका करणाऱ्या मानसी जोशी सांगतात.

जवळपास २५ वर्षांनंतर मुंबईत अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला आज सुरुवात झाली. त्यानिमित्तानेपाहा या नाटकाच्या कलाकारांशी बीबीसी प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांचा संवाद.

निर्मिती - जान्हवी मुळे

शूटिं आणि एडिटिं - शरद बढे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)