व्हीडिओ : गोष्ट मान्सूनच्या भारतापर्यंतच्या प्रवासाची

व्हीडिओ : गोष्ट मान्सूनच्या भारतापर्यंतच्या प्रवासाची

भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि भारतातली शेती पूर्णपणे पावसावरच अवलंबून असते. पण हा पाऊस नेमका येतो कुठून, तो तयार कसा होतो, हा सगळाच प्रवास मजेशीर आहे.

मान्सून तयार कसा होतो?

भारतात मान्सून एवढ्या मोठ्या प्रमाणात सक्रीय असण्यासाठी पृथ्वीची रचना कारणीभूत आहे. पृथ्वी 21 अंशांमध्ये कलली आहे. त्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध सुर्याच्या दिशेला असतो.

परिणामी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात थंडी असते. जास्त तापमान असतं तिथे कमी दाबाचा आणि कमी तापमानाच्या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा असतो. वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात.

त्यामुळे दक्षिण गोलार्धात असलेल्या दक्षिण पॅसिफिक महासागरातले वारे उत्तर गोलार्धाच्या दिशेने येतात. येताना हे वारे समुद्रावरचं बाष्प आणतात. अरबी समुद्रात आल्यानंतर हे वारे भारतातल्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे आकृष्ट होतात.

भारतात आल्यावर हे ढग उंचावर जातात आणि थंड हवा लागली की, बाष्प पावसाच्या रूपाने खाली जमिनीवर पडतं.

मान्सून कुठे कुठे पडतो?

काही अभ्यासकांच्या मते मान्सूनचं वय 80 लाख वर्षांपेक्षा जास्त आहे. तर काही जण हे आयुर्मान दीड ते दोन कोटी वर्षांपर्यंत मागे खेचतात. पण हा पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा इव्हेंट आहे, हे नक्की!

मान्सून फक्त भारतातच पडतो असं नाही. तो आफ्रिका खंडातल्या काँगो, सोमालिया, केनिया, युगांडा या देशांमध्ये पडतो. तसंच आशियात मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये आढळतो. ऑस्ट्रेलियातही मान्सून आहे. त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीवर मान्सूनचा पाऊस पडतो.

पाहा बीबीसी प्रतिनिधी रोहन टिल्लू यांचा हा माहितीवर्धक आणि गारेगार व्हीडीओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)