नाट्यसंमेलनात पहिल्यांदाच नेत्रहीन कलाकारांचा नृत्य-नाट्य आविष्कार

नाट्यसंमेलनात पहिल्यांदाच नेत्रहीन कलाकारांचा नृत्य-नाट्य आविष्कार

रंगभूमीवर यापूर्वी अभावानंच जे घडलं आहे ते प्रत्यक्ष घडलं आहे आणि महाकवी कालिदासाच्या अलौकिक प्रतिभेच्या दृष्टीला डोळस रूप दिलं आहे अंध कलाकारांनी.

पुण्यातील 19 अंध कलाकारांनी, ज्यांना याअगोदर कधीही अभिनय म्हणजे काय ते माहित नव्हतं, त्यांनी 'अपूर्व मेघदूत' हा नृत्य-नाट्य अविष्कार साकारला आहे.

हा प्रयोग यंदा मुलुंड इथं होत असलेल्या नाट्यसंमेलनाचं मोठं आकर्षण आहे. कसं झालं हे नाट्य शक्य?

रिपोर्टर - मयुरेश कोण्णूर

शूटिंग आणि एडिटिंग - शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)