व्हीडिओ : जपानमध्ये भूकंप,
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्हीडिओ : जपानमध्ये भूकंपात शाळा बुडाल्या, पाईप फुटले, तिघांचा मृत्यू

जपानच्या ओसाकामध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपात कमीतकमी तीन जणांचा मृत्यू तर 200हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे.

ओसाकामध्ये स्थानिक वेळेनुसार सोमवारी सकाळी आठ वाजता हा भूकंप आला. परिसरातले एअरपोर्ट अनेक तासांसाठी बंद होते तर ट्रेनची ये-जा आणि फॅक्टरीमधलं काम थांबवण्यात आलं होतं.

या 6.1 तीव्रतेच्या भूकंपाने त्सुनामी येणार नाही, असं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे, त्यामुळे अणू ऊर्जा केंद्रांमध्ये काम सुरळीतपणे चालूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

परिसरातल्या शाळेची भिंत पडून एक नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

शिवाय NHK या राष्ट्रीय वाहिनीनुसार एका वृद्धाचाही असाच कोसळलेल्या भिंतीखाली दबून जीव गेला आहे. आणि एक म्हातारा आपल्या घरीच पुस्तकांच्या कपाटाखाली दबून मरण पावला.

भूकंपप्रवण क्षेत्रात येणाऱ्या जपानमध्ये जगभरातल्या 6.0 किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपांपैकी 20 टक्के भूकंप होतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)