व्हीडिओ : अमेरिकेच्या सीमेवर पिंजऱ्यात बंद मुलांचं रडणं कॅमेऱ्यात कैद

व्हीडिओ : अमेरिकेच्या सीमेवर पिंजऱ्यात बंद मुलांचं रडणं कॅमेऱ्यात कैद

अमेरिकत शोधपत्रकारिता करणाऱ्या ProPublica मीडियानं सीमेवरील पॅट्रोलिंग सेंटरमध्ये रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ टेपमध्ये लहान मुलं रडताना दिसतात. तर सुरक्षा रक्षक त्यावर हास्यविनोद करताना दिसतात.

इथं ऑर्केस्ट्रा सुरू आहे, असं दिसतंय, असं एक सुरक्षा रक्षक म्हणत असल्याचं या ऑडिओ टेपमध्ये एकू येतं.अमेरिकेच्या सीमेवर बेकायदेशीररित्या प्रवेश करणाऱ्या स्थलांतरित पालकांपासून या मुलांना वेगळं करण्यात आलं आहे

‘zero-tolerance’ धोरणामुळे ट्रंप सरकारवर गंभीर टीका होत आहे.या धोरणाअंतर्गत सीमा ओलांडणाऱ्या प्रौढ व्यक्तींना अटक होते आणि बेकायदा प्रवेशासाठी कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं. पण त्याचवेळी प्रौढांना अटक करताना लहान मुलांना वेगळं केलं जातं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)