संतोष कंवर ही 'सोलर सहेली' आहे.
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : घराघरात पोहोचली वीज; 'सोलर सहेली'नं कमाल केली

राजस्थानच्या ग्रामीण भागात सौर उर्जेमुळे मोठे बदल घडायला सुरुवात झाली आहे. काय आहे हा प्रयोग?

भारतात आजही 27 कोटी लोक विजेशिवाय राहतात. ते बहुतांश केरोसिनचे दिवे वापरतात. त्यामुळे कार्बनचं प्रमाण वाढतं आहे.

ग्रामीण भागात लोकांना केरोसिनचे दिवे वापरू नका, असं सांगणं खूपच कठीण आहे. त्याहून कठीण आहे सोलर दिव्यांचा वापर करण्याचा आग्रह धरणं.

अजिता शाह यांच्या 'फ्रंटियर मार्केट्स' या संस्थेनं सोलरचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात त्यांना मदत होते आहे ती 'सोलर सहेली'ची!

एक हजार सहेलींनी 1 लाख 75 हजार कुटुंबांना सौरउर्जेकडे आणलं आहे. त्याची ही गोष्ट व्हीडिओतून जाणून घेऊ या.

बीबीसीच्या या तापमानविषयक सीरिजसाठी स्कोल फाऊंडेशननं निधी दिला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)