फ्रेंच ओपन खेळल्यानंतर विम्बल्डनचा सामना जिंकता येतो का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन हे एकाच वर्षी जिंकणं कठीण का आहे?

सोमवारपासून विम्बल्डन सुरू होत आहे. फ्रेंच ओपन स्पर्धा नुकतीच झाली. एकाच वर्षी या दोन्ही स्पर्धा जिंकण्याचा विक्रम आतापर्यंत केवळ नऊ जणांनीच केला आहे.

पॅरीसमध्ये फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर त्याच वर्षी विम्बल्डनवरही जेतेपदाची मोहोर उमटवणं शक्य आहे काय? या प्रश्नाचं उत्तर कठीण आहे.

कारण, जागतिक टेनिसमध्ये आजवर 9 खेळाडूंनाच हे आव्हान पेलता आलं आहे. यात राफेल नदालचा नंबरही लागतो.

पण, हे सगळ्यांनाच शक्य नाही. याचं कारण, दोन्ही ठिकाणच्या मैदानाच्या पृष्ठभागातील भिन्नतेमुळे चेंडू उसळण्यातही फरक होतो. यामुळे खेळाचं स्वरुप बदलून जातं.

नेमकं कसं ते जाणून घ्या या व्हीडिओमधून.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)