मुंबईतल्या सेक्स वर्कर महिलांची आर्थिक सुरक्षा वाऱ्यावर...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्हीडिओ - कामाठीपुरातली एकमेव बँक बंद : आता 5,000 सेक्स वर्कर्स पैसे कुठे साठवणार?

कोलकात्याचा आशियातला सगळ्यांत मोठा रेड लाइट एरिया - सोनागाची - आहे. त्यानंतर मुंबईच्या कामाठी पुऱ्याचं नाव घेतलं जातं. इथे जवळपास 5,000 सेक्स वर्कर महिला राहतात.

भारतात सेक्स वर्क अवैध असल्यानं आमच्या जीवनात खूप समस्या असल्याचं या महिला सांगतात. समाजात त्यांना कोणतीही ओळख नाही. अनेकींकडे त्यांच्या अस्तित्वाचा कोणताही लिखित किंवा कागदी पुरावा नाही.

पण आता या महिलांपुढे नवीन समस्या येऊन उभी आहे. या महिलांची कमाई ठेवण्यासाठी यापूर्वी परिसरात एक बँक होती. मात्र आता ही बँकही बंद झाली आहे.

कामाठीपुऱ्यातल्या रेड लाईट परिसरात राहणाऱ्या 5000 सेक्स वर्कर महिलांचं कोणत्याही प्रमुख बँकेत खातं नाही. काही सेक्स वर्कर महिला सांगतात की, त्यांच्याकडे बँका आधार कार्ड, पॅन कार्ड सारखी कागदपत्रं मागतात. पण ही कागदपत्रं नसल्यानं त्यांना खातं उघडण्यासाठी प्रमुख बँकांमध्ये अडचणी येतात.

2007 मध्ये 'संगिनी विमेन्स को-ऑपरेटिव्ह बँके'ची स्थापना झाली होती. 5,000 महिला या बँकेत खातेधारक होत्या. मात्र पुरेशा ठेवींअभावी ही बँक बंद झाली.

आता पैसे कसे आणि कुठे साठवणार, हा प्रश्न या सेक्स वर्कर्सपुढे उपस्थित झाला आहे.

रिपोर्टर - बीबीसी प्रतिनिधी पुजा अगरवाल

शूटिंग आणि एडिटिंग - जाल्स्टन एसी

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)