पाहा व्हीडिओ - धुळे हत्याकांड: 'लोक त्या 5 जणांना रॉडने मारत होते'

पाहा व्हीडिओ - धुळे हत्याकांड: 'लोक त्या 5 जणांना रॉडने मारत होते'

एका लहान मुलीच्या मागे एक अनोळखी माणूस लागला आहे, असं वाटून धुळ्यातल्या राईनपाडा गावात काही तरुण जमले आणि भिक्षा मागणाऱ्या त्या पाच जणांना मारायला सुरुवात केली.

भारत भोसले आणि इतर 4 लोक भिक्षा मागण्यासाठी ते धुळ्यातल्या राईनपाडा गावात उतरले होते. पण थोड्याच वेळात त्यांना मुलांना पळवणारी टोळी समजून बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्यातच 5 जणांनी जमावाकडून हत्या झाली.

राईनपाडा ग्रामपंचायतीचे सदस्य विश्वास गांगुर्डे यांनी ही घटना पोलिसांना कळवली होती. ते सांगतात, "लोक त्यांना खूप मारत होते. लोखंडी सळया, रॉडने मारहाण करत होते. लोकांना शंका होती की हे लोक मुलांची किडनी काढून विकणारी टोळी आहे. ते मुलांचं अपहरण करतात. आम्ही त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलं आणि पोलिसांना कळवलं. पण जमाव ऐकत नव्हता."

त्यानंतर सोमवारी राईनपाड्यात कडक पोलीस बंदोबस्त होता. गावात स्मशान शांतता पसरलेली होती. प्रत्येक घराचं दार बंद होतं. बहुतांश गावकरी गावात नव्हते.

रिपोर्टर - प्रविण ठाकरे

एडिटिं- गणेश पोळ

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)