व्हीडिओ: 'झाडं गुपचूप बोलतात आणि भांडतातही'

व्हीडिओ: 'झाडं गुपचूप बोलतात आणि भांडतातही'

जमिनीवर उभी असणारी झाडं शांत आहेत असं वाटत असलं तरी त्यांच्या मुळाशी बरंच काही सुरू असतं. झाडं बुरशीमार्फत एकमेकांशी संपर्क साधत असल्याचं संशोधकांना आढळलं आहे.

केवळ संपर्कच नाही, तर झाडं एकमेकांना पोषक द्रव्यांचा पुरवठाही करतात. त्याचबरोबर काही झाडं आपल्या आजूबाजूच्या झाडांना नष्ट करण्यासाठी विषारी द्रव्यंही त्यांना पोहोचवतात. या सगळ्या क्रियांसाठी बुरशी महत्त्वाची भूमिका बजावते. बुरशीचं खूप मोठं जाळं या झाडांना एकमेकांपासून बांधून ठेवतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)