या प्राण्याची जगात सर्वाधिक तस्करी का होेते?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : जगात या प्राण्याची सर्वाधिक शिकार होते कारण...

पँगोलीन या सस्तन प्राण्याची जगात सर्वाधिक तस्करी होते. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या प्राण्याची शिकार रोखण्यासाठी काय केलं जातं आहे?

जगात दर पाचव्या मिनिटाला एका पँगोलीनची हत्या होते, कारण त्याचं मटण रुचकर मानलं जातं. त्याच्या खवल्यांचा वापर चिनी औषधांमध्ये होतो.

शिकारीमुळे पँगोलीनच्या आठही प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. गेल्या दशकभरात एक लाखांहून जास्त पँगोलीन मारण्यात आले आहेत.

या शिकारीवर ब्रिटिश शास्त्रज्ञांनी फिंगरप्रिंटिंगचा उपाय शोधला आहे. काय आहे ही पद्धत आणि ती कशी उपयोगी पडेल? पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)