पाहा व्हीडिओ : कोल्हापूरच्या भाषेत फुटबॉल म्हणजे काय रं भाऊ?

पाहा व्हीडिओ : कोल्हापूरच्या भाषेत फुटबॉल म्हणजे काय रं भाऊ?

कोल्हापूरमध्ये कुस्ती इतकंच फुटबॉलवरही प्रेम केलं जातं. खेळावर प्रेम करणाऱ्या कोल्हापूरकरांमुळे या शहराची क्रीडानगरी अशी ओळख बनली आहे.

इथं कुस्ती इतकंच फुटबॉलचंही वेड आहे. शहरातल्या शिवाजी स्टेडियमवर सराव करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी फुटबॉल म्हणजे जीव की प्राण आहे.

तर काहींसाठी कोल्हापूरची अस्मिता, ईर्षा आणि जिद्द म्हणजे फुटबॉल असल्याचं खेळाडू सांगतात.

कोल्हापुरातली तालीम मंडळं दरवर्षी फुटबॉलच्या स्पर्धा आयोजित करतात. संघ कोणताही असो, खेळाडू कोणीही असो झणझणीत मिसळसोबत फुटबॉलचा तडका इथंच पाहायला मिळतो.

रिपोर्टर - स्वाती पाटील-राजगोळकर

एडिटिंग - गणेश पोळ

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)