‘लवकरच नेटफ्लिक्स, हॉटस्टार घरातल्या टीव्हीवर बघायला मिळणार’
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ - ‘लवकरच नेटफ्लिक्स, हॉटस्टार घरातल्या टीव्हीवर बघायला मिळणार’

एका अहवालानुसार भारतात जवळपास 10 कोटी लोकांनी डिजिटल प्लॅटफॉर्म्सची निवड केली आहे. तर, टीव्हीचे प्रेक्षक केवळ 80 कोटीच राहिले आहेत.

सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरच्या संधीमुळे बॉलीवूडमधले करण जोहर, अनुराग कश्यपसारखे मोठे दिग्दर्शक एकत्र आले. त्यांनी मोबाईल स्क्रीनसाठी एका चित्रपटाची निर्मितीही केली.

तरुण लोक क्रीडा आणि मनोरंजनासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. पण, यामुळे सिनेमा आणि केबल टीव्ही यांसारख्या पारंपरिक माध्यमांना धोका आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

देशात असे 30 डिजिटल प्लॅटफॉर्म्स असून हॉटस्टार, अमेझॉन प्राईम व्हीडिओ, नेटफ्लिक्स, जोई टीव्ही आणि वूट हे आघाडीचे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत.

दिग्दर्शक, डिजिटल प्लॅटफॉर्ममागचे चेहरे यांच्याशी बोलून घेतलेला आढावा. पाहा व्हीडिओ

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)