मृत्यूच्या दाढेतून सुटकेचा थरार संपला
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

थायलंड : मृत्यूच्या दाढेतून 13 जणांच्या सुटकेचा थरार

थायलंडच्या गुहेत अडकलेली 12 मुलं आणि त्यांचे फुटबॉल प्रशिक्षक यांची धोकादायक परिस्थितीतून सुटका करण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.

अत्यंत धोकादायक वातावरणात लहान मुलांना डायव्हिंगचं प्रशिक्षण देत बचाव पथकाने ही धाडसी मोहीम सुफळ संपूर्ण केली.

ही मुलं आणि प्रशिक्षक यांनी अनेक दिवस अन्नपाण्याविना काढले. त्यानंतर बचाव पथक त्यांच्यापर्यंत पोहोचले.

मात्र सततच्या पावसामुळे गुहेतून या सगळ्यांची सुटका करणं अवघड होतं.

मात्र थायलंड तसंच जगभरातल्या डायव्हर्सनी जीव धोक्यात घालून मुलांसह प्रशिक्षकांचा जीव वाचवला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)