पाहा व्हीडिओ : ‘थायलंडच्या गुहेतल्या मुलांना आम्ही वाचवू शकू असं वाटलं नव्हतं’
पाहा व्हीडिओ : ‘थायलंडच्या गुहेतल्या मुलांना आम्ही वाचवू शकू असं वाटलं नव्हतं’
थाई नेव्ही सीलचे प्रमुख रिअर अॅडमिरल अर्पाकॉर्न युकोंगकाव आणि त्यांच्या टीमने थायलंडच्या गुहेत अडकलेल्या मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली.
ती मुलं जिवंत असतील असं आम्हाला वाटलं नव्हतं, असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
सततच्या वाढत्या पाण्यामुळे त्यांच्या टीमला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. “ती मुलं जिवंत असतील अशी एक अंधुक आशा होती आणि त्या आशेवरच आम्ही पुढे जात राहिलो. शेवटी ती मुलं व्यवस्थित सापडली.
“मी खूप खुश आहे आणि मला वाटतं थाई जनताही खूप खुश आहे,” युकोंगकाव सांगतात. “सरतेशेवटी ती अंधुक आशा सुखद शेवटात बदलली.”
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)