पाहा व्हीडिओ: 'अपयशातून धडा घेऊन आयुष्यात पुढं जायला हवं'

पाहा व्हीडिओ: 'अपयशातून धडा घेऊन आयुष्यात पुढं जायला हवं'

जिंकणं हरणं हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पराभवानं खचून न जाता आयुष्यात पुढे जा असा संदेश हे लोक देत आहेत.

2012 मध्ये एका मेक्सिकोतल्या समूहाने 'Failure Organisation' सुरू केली. लोकांनी एकत्र येऊन आपण सुरू केलेले उद्योग-धंदे का तोट्यात जातात याची चर्चा करणं हा या संस्थेचा हेतू होता.

त्यानंतर दोनच वर्षांत त्यांनी फेल्युअर नाईट/फन नाईट या नावाने एक कार्यक्रम सुरू केला. यामुळे उद्योजकांना आपल्या अपयशाचं दुःख आणि लाज बाजूला सारून त्याविषयी बोलण्याची प्रेरणा मिळाली. आणि त्यांच्या अशा मोकळं बोलण्याने इतरांनाही प्रेरणा मिळाली.

लवकरच ही एक जागतिक चळवळ बनली. आता अशा प्रकारचे कार्यक्रम भारतासकट 79 देशांत होतात.

रिपोर्टिंग: देविना गुप्ता,

निर्माती: सुरंजना तेवारी,

शूट अॅंड एडिट: प्रेमानंद भूमिनाथन

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)