थायलंडच्या गुहेतून बाहेर आलेल्या मुलांचा हा व्हीडिओ तुम्ही पाहिला का?

थायलंडच्या गुहेतून बाहेर आलेल्या मुलांचा हा व्हीडिओ तुम्ही पाहिला का?

थायलंडमधील गुहेतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेली मुलं सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

बचाव कार्यादरम्यान त्यांना भूल देण्यात आली होती, असं सूत्रांनी बीबीसीला सांगितलं.

आता या मुलांची प्रकृती स्थिर आहे.

आता त्यांच्या पालकांना रुग्णालयात सोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना डॉक्टरांनी मास्क लावण्यास सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)