ऑटिझमविरोधात लढा, वरुणला येतात 30 भाषा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हिडिओ: ऑटिझमचा सामना करत तो शिकला 30 भाषा आणि शास्त्रीय गाणं

वरुण तीन वर्षांचा असताना त्याला ऑटिझम असल्याचं पालकांना कळलं. तोच वरुण आता शास्त्रीय संगीतात पारंगत झाला असून चक्क 30 भाषा लिहू आणि बोलू शकतो.

हैद्राबादेतील 19 वर्षीय वरुण चेनीचेरी या तरुणाने ऑटिझम असतानाही स्वतःला विविध क्षेत्रात सिद्ध केलं आहे.

वयाच्या सहाव्या वर्षांपर्यंत ज्याच्या मुखातून एक शब्दसुद्धा फुटत नव्हता, तोच वरुण आता शास्त्रीय गायन करतो.

वरुणला शाळेत प्रवेश मिळत नसल्यानं त्याचे पालक UKला स्थलांतरित झाले. नवव्यावर्षी ते भारतात परतले.

वरुणच्या या प्रवासाची माहिती देत आहे त्याची आई माधवी अदिमूलम.

रिपोर्टरः पद्मा मिनाक्षी

प्रोड्यूसरः संगितम प्रभाकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)