पाहा व्हीडिओ - हा आहे जगातला सर्वांत जास्त वजनाचा मुलगा : वय 14 वर्षं आणि वजन 237 किलो

पाहा व्हीडिओ - हा आहे जगातला सर्वांत जास्त वजनाचा मुलगा : वय 14 वर्षं आणि वजन 237 किलो

237 किलो वजनाच्या मिहीरचं वजन 100 किलोंनी कमी करण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न आहे.

डिसेंबर 2017मध्ये 237 किलो वजनाच्या मिहीरनं दिल्लीच्या साकेतमधील मॅक्स हॉस्पिटलला भेट दिली. तो जगातला सर्वाधिक वजनाचा किशोरवयीन असून त्याचा BMI 92kg/m2 इतका आहे. किमान 40 किलो वजन कमी करावं, असा सल्ला त्याला डॉक्टरांनी दिला होता.

मिहीरची आई पूजा जैन यांनी बीबीसीला सांगितलं की, "दुसरीनंतर त्याला शाळा सोडावी लागली. शाळेत जाताना त्याला खूप त्रास सहन करावा लागत असे. त्याला पिझ्झा, पास्ता आणि कटलेट आवडतं. त्याला फार हालचाल देखील करता येत नसल्यामुळे तो दिवसभर बेडमध्ये पडून राहत असे. मग त्याचं वजन आणखी वाढलं.

"जर त्याला लघवीला जायचं आली तर ती आम्ही त्याला बेडवरच करायला सांगत असू. आधी त्याच्या रूमपासून बाथरूम दूर होतं. मग त्याच्या रूममध्येच बाथरूम बांधण्यात आलं. आम्हीच त्याला अंघोळ घालत असू."

ऑपरेशननी वजन कमी करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याला आहाराबाबत पथ्यं सांगितली होती. एप्रिलमध्ये त्याच्यावर ऑपरेशन करण्यात आलं. त्यानंतर त्याचं वजन कमी झालं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)