ऑस्ट्रेलियातले पहिले गे इमामः माझी मशीद आता माझ्या हृदयात
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

हे समलिंगी मुस्लीम धर्मगुरू म्हणतात 'माझी मशीद माझ्या मनात'

नूर वारसमी हे ऑस्ट्रेलियाचे पहिले गे इमाम आहेत. लोकांना हे कळल्यावर त्यांना धमक्या यायला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं.

नूर म्हणतात, "माझी लैंगिकता उघड केल्यानंतर धर्माचा आधार घेत माझा छळ झाला."

त्यांनी नंतर सोशल मीडियावर LGBTI मुस्लिमांचा मरहाबा नावाचा गट तयार केलाय. जगण्यावरचा विश्वास उडलेल्या तरुणांना नवी आशा मिळाली, अनेकांना नवजीवन मिळालं आणि कुटुंब एकत्र आली, असं त्यांना वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)