'फोर्ब्ज'नं 2018चे सर्वाधिक कमाई करणारे सेलिब्रिटी जाहीर केलेत
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ: 'फोर्ब्ज'च्या टॉप टेन श्रीमंत सेलेब्रिटींच्या यादीत फक्त 2 महिला

'फोर्ब्ज'नं 2018चे सर्वाधिक कमाई करणारे सेलेब्रिटी जाहीर केलेत. त्यात फ्लाईड मेवेदर या वादग्रस्त बॉक्सरचं नाव आघाडीवर आहे. फूटबॉलपटू मेस्सी आणि रोनाल्डो हे 8व्या आणि 10व्या स्थानावर आहेत. तसंच, संगीत विश्वातले U2, एडवर्ड शिरेन, कोल्डप्ले हे या 10 जणांत आहेत.

या यादीत सोशल मीडिया आणि टीव्ही स्टार कायली जेनर तिसऱ्या स्थानावर आहे. कायली कॉस्मेटिक ब्रॅण्डनं तिला गतवर्षी 1138 कोटी मिळवून दिले.

चौथ्या स्थानी 1007 कोटींसह टेलिव्हिजन स्टार जुडी आहेत. त्यांनी कोर्ट रुम या टीव्ही शोचे जुने एपिसोड विकून ही कमाई केली.

सुमारे 1638 कोटींच्या कमाईसह जॉर्ज क्लुनी दुसऱ्या स्थानी आहेत.

तर पहिला क्रमांक वादग्रस्त बॉक्सर फ्लाईड मेवेदर याचा आहे. त्यानं 1954 कोटींची कमाई केली आहे.

आजवरच्या सर्वोत्कृष्ट बॉक्सरमध्ये त्याचा समावेश होत असला तरी त्याची कारकीर्द वादांनी झाकोळली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)