युद्धातून वाचलेली नात आजीला भेटते तेव्हा...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ: हरवलेली नात आजीला सापडते तेव्हा...

आठ वर्षांच्या जुमनाला युद्धग्रस्त लिबियातून वाचवण्यात आलं. आईवडिल मारले गेले आणि आजीआजोबांशी संपर्क तुटला होता. अशी अनेक मुलं आहेत.

2015 मध्ये जुमनाच्या वडिलांनी तिची आई आणि भावासोबत इजिप्त सोडलं आणि IS मध्ये सहभागी होण्यासाठी ते लिबियात गेले.

IS विरूद्ध झालेल्या लढाईत जुमनाचे आईवडील आणि भाऊ मारले गेले. जुमनाच्या परिवारापैकी आता फक्त तिचे आजीआजोबा आहेत ते इजिप्तमध्ये राहतात.

“माझ्या घरचे इथून निघून गेल्यापासून माझ्या डोळ्याला डोळा नाही. दिवसरात्र त्यांचा विचार येतो. मी नुसती रडतच असते,” जुमनाची आजी सांगते.

आपली नात जिवंत पाहून त्यांच्या आनंदाला पारावार नाही. पण अजूनही त्या तिला भेटू शकत नाही. जुमनासारखी अनेक मुलं आपापल्या घरी जाण्याच्या प्रतिक्षेत आहेत पण त्यांना अजुनही अधिकृत परवानगी मिळालेली नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)