गुहेतून बचावलेले खेळाडू झाले भिख्खू
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : थायलंडच्या गुहेतून वाचलेली मुलं झाली बौद्ध भिख्खू

थायलंडच्या गुहेत तरुण मुलांची एक फुटबॉल टीम सुमारे दोन आठवडे अडकली होती.

अथक प्रयत्नानंतर त्या मुलांना बाहेर काढण्यात आलं. आता या मुलांना काही दिवस भिख्खू करण्यात आलंय.

एखाद्या मोठ्या संकटातून बाहेर पडल्यानंतर आत्मशुद्धी करण्याची प्रथा बौद्ध समाजात आहे. ही मुलं एका बौद्ध मठात नऊ दिवस राहणार आहेत. या बचावकार्यात एका डायव्हरचा मृत्यू झाला होता. या डायव्हरलासुद्धा यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)