मंगळावर पाण्याचं सरोवर सापडलं, मग जीवसृष्टी असेल काय?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : मंगळावर सरोवर सापडलं; आता शोध जीवसृष्टीचा

मंगळावर प्रथमच भूमिगत पाण्याचं सरोवर सापडलं आहे. त्यामुळे तिथं जीवसृष्टी असण्याची शक्यता वाढली आहे, असं आंतरराष्ट्रीय संशोधकांचं म्हणणं आहे.

मंगळावरील बर्फाच्या थराखाली 20 किमी व्यासाचं तळं असल्याचं इटलीच्या संशोधकांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या संशोधनात समोर आलं. सायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.

मंगळावर सापडलेला हा पाण्याचा सर्वांत मोठा साठा असून मंगळावर पाणी भरपूर प्रमाणात असावं असं ऑस्ट्रेलियातील स्विनबर्न विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक अलन डफी यांनी सांगितलं.

मंगळ आता थंड आहे. तो उजाड आणि कोरडा असून पूर्वी तो उबदार आणि ओलसर होता. तिथं मोठ्या प्रमाणात पाणी होतं. 3.6 अब्ज वर्षांपूर्वी तिथं पाण्याची सरोवरं होती. युरोपीय स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेस ऑर्बिटर यानावरील रडारच्या मदतीनं या सरोवराचा शोध लागला आहे.

यापूर्वीच्या संशोधनात मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असल्याच्या खुणा मिळाल्या होत्या, मात्र मंगळावर ठोस पाणी आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नासाच्या क्युरियॉसिटी रोव्हरनं ज्या जलाशयांचा तळांचा शोध लावला होता, त्यावरून पूर्वीच्या काळात मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असावं हे समोर आलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)