"अपघात चालकाच्या हलगर्जीपणामुळे नाही!": प्रकाश सावंतदेसाई
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अपघात चालकाच्या हलगर्जीपणामुळे नाही : प्रकाश सावंतदेसाई

पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात बस कोसळून दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठातील 30 कर्मचारी ठार झाले. मात्र हा अपघात चालकाच्या हलगर्जीपणामुळे झालेला नाही, असं या अपघातात बचावलेल्या प्रकाश सावंतदेसाई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

"गाडीचा चालक हा कृषी विद्यापीठाच्या नेहमीच्या चालकांपैकीच एक होता. तो ट्रक आणि बसच चालवायचा. त्याच्या चालवण्याबद्दल कधीच कोणाची तक्रार नव्हती. हा अपघात त्याच्या चुकीमुळे नाही, तर रस्त्याच्या कडेला माती खणून ठेवल्याने झाला आहे," सावंतदेसाई यांनी सांगितलं.

"मी वाचलो, ते केवळ दैव बलवत्तर म्हणूनच! मात्र 'मी एकटाच कसा वाचलो, नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे,' असा विचार करणाऱ्यांना परिस्थितीचं गांभीर्य कधीच कळणार नाही. त्यांच्यावर असा प्रसंग आला, तर कदाचित त्यांना समजू शकेल," असा टोलाही त्यांनी हाणला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)