कसं आहे भारतातलं पहिलं आयकिया स्टोअर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : असं आहे भारतातलं पहिलं IKEA स्टोअर

जगातली सगळ्यात मोठी रिटेल फर्निचर कंपनी असलेल्या आयकियानं भारतातलं पहिलं शोरुम हैदराबादमध्ये सुरू केलं आहे. सुमारे 4 लाख स्केअर फूटांवर पसरलेल्या या शोरुममध्ये 7500च्या वर उत्पादनं आहेत.

फर्निचर बरोबरच कटलरी आणि गृहोपयोगी वस्तूही इथं आहेत. भारतीय लोकांच्या आवडी-निवडी बघून कंपनीनं त्यांच्या मांडणीत आणि कार्यशैलीत काही बदल केले आहेत.

एरवी आयकियाचं फर्निचर घरी आणून तुमचं तुम्हाला जोडावं लागतं. भारतात मात्र फर्निचर घरी पोहोचवल्यावर जोडणी करण्यासाठी सुतार पाठवला जाणार आहे.

हैदराबादमध्ये 13 एकर जागेवर हे शोरुम पसरलेलं आहे. एक हजारपेक्षा जास्त लोक बसू शकतील असा कॅफेटेरियाही इथे आहे.

बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी योगिता लिमये यांनी करुन दिलेली शोरुमची ही ओळख.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)