पाहा व्हीडिओ : हे असं मटण खावं लागणार, लवकरच!

पाहा व्हीडिओ : हे असं मटण खावं लागणार, लवकरच!

प्रयोगशाळेत तयार झालेलं मटण म्हणजेच 'क्लिन मीट' याचा सध्या बोलबाला आहे. त्याच्यावर खूप चर्चा सुरू आहे.

पण प्रयोगशाळेत मटण का तयार करायचं?

21व्या शतकाच्या अखेरपर्यंत जगाची लोकसंख्या 11 अब्ज कोटीपर्यंत पोहोचणार आहे. इतक्या लोकांचं पोटं कसं भरायचं, असा प्रश्न पडू लागला आहे.

कारण, जगातलं चालू वर्षभराचं अन्नधान्य 1 ऑगस्ट रोजीचं संपलं आहे. म्हणजे मानवजातीचा एका वर्षाचा आहार आपण 7 महिन्यांतच संपवला आहे.

या वाढत्या मागणीचा विचार करता जगात 2015मध्ये 31.8 कोटी टन मटणाचा वापर झाला. 2050 पर्यंत हा आकडा 45.5 कोटी टनांपर्यंत जाणार आहे.

त्यामुळे प्रयोगशाळेत अन्नाचं उत्पादन करून लोकसंख्येची अन्नाची वाढती गरज पू्र्ण करावी लागणार आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)