पाहा व्हीडिओ : केरळमध्ये शतकातल्या मोठ्या पुरामुळे असा उडालाय हाहाकार
केरळ राज्याला सध्या शतकातल्या भीषण पुरानं वेढलं आहे. राज्यातल्या मल्लपुरम, त्रिसूर, कोची इथे पुरामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे.
केरळमध्ये गेल्या 10 दिवसांत 194 जणांचा या पुरामुळे बळी गेला असून 2 लाखांहून अधिक जण बाधित झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळसाठी 500 कोटींचं मदत पॅकेज जाहीर केलं आहे. लष्कर, NDRF, नौदल आणि हवाई दलामार्फत बचावाचं काम राज्यात ठिकठिकाणी सुरू आहे.
मल्लपुरममध्ये डोंगराळ भाग असून इथे भुस्खलन झाल्यामुळे घरांचं नुकसान झालं आहे. तर, त्रिसूर भागात पुराचं पाणी काहीसं ओसरल्यानंतर पेट्रोल, रॉकेल यांसारख्या जीवनावश्यक घटकांची टंचाई निर्माण झाल्यामुळे लोक हवालदिल झाले आहेत.
तर, दुसरीकडे कोचीचं विमानतळ पाणी शिरल्यामुळे 26 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे.
या कोचीमध्ये पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना कँपमध्ये सुरक्षितरित्या हलवण्यात आलं असलं तरी अन्नपदार्थ, पिण्याचं पाणी आणि औषधं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं अवघड झालं आहे. अन्नाच्या शोधात ट्रकभरून लोकं एका कँपमधून दुसऱ्या कँपमध्ये जाताना दिसत आहेत. पण, पुराच्या पाण्यामुळे त्यांना वाहतूक करतानाही अडचण येत आहे.
या सगळ्या भीषण परिस्थितीमुळे केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी आर्थिक मदत करण्यासाठीचं आवाहान केलं आहे.
केरळहून बीबीसी प्रतिनिधी योगिता लिमये, सलमान रावी, प्रमिला क्रिष्णन यांचा रिपोर्ट.
निर्मिती - किंजल पंड्या
ग्राफिक - गगन नऱ्हे
एडीट - परवेझ अहमद
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)