पाहा व्हीडिओ : गोव्यातल्या विंदालू डिशचा उगम कुठलाय माहितीये?
पाहा व्हीडिओ : गोव्यातल्या विंदालू डिशचा उगम कुठलाय माहितीये?
पास्ता, फॉर्च्यून कुकीज, क्रॉसंट्स आणि विंदालू या डिशची सुरुवात कशी आणि कुठे झाली याबद्दल तुम्हाला काही तरी नक्कीच माहिती असले. पण ती माहिती किती खरी आहे?
इटालियन खाद्यपर्थांमध्ये सर्वांत वरचा मान आहे पास्ता या डिशला. पण गंमत म्हणजे पास्ता इटलीचा नाहीच. अरब व्यापाऱ्यांनी पास्ता इटलीत आणला, असं समजलं जातं.
फॉर्च्यून कुकीज जगभरातल्या चायनिज रेस्टॉरंट्समध्ये प्रसिद्ध असतील. पण या कुकीजही मुळच्या चीनच्या नाहीत. ब्रिटनमधल्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये विंदालू ही डिश लक्ष वेधते. पण विंदालूचं मूळ भारत अथवा ब्रिटनमध्ये नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)