पाहा व्हीडिओ - काय म्हणता, कुत्र्यांनाही टेन्शन येतं
पाहा व्हीडिओ - काय म्हणता, कुत्र्यांनाही टेन्शन येतं
तुमच्या कुत्र्याच्या नाकावरचे केस जर अकाली पिकले असतील तर ही तुमचा कुत्रा तणावात असण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतल्या काही विद्यापीठांनी केलेल्या संशोधनात चार वर्षांखालील 400 कुत्र्यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. नाकांवरचे केस पिकलेले आणि केस न पिकलेले अशी कुत्र्यांची वर्गवारी केली.
जेवढे जास्त केस पिकलेले तेवढा कुत्रा जास्त अस्वस्थ असतो, असं या संशोधनात दिसून आलं. अकारण भुंकणे, उडया मारणे ही कुत्रा अस्वस्थ असण्याची लक्षणे आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)