महिलांनो, जाणून घ्या बिजांडांशी संबधित PCOD या आजार विषयी

महिलांनो, जाणून घ्या बिजांडांशी संबधित PCOD या आजार विषयी

Polycystic Ovarian Disease (PCOD) आजार नेमका आहे तरी काय? महिलांना होणारा हा आजार बिजांडाशी संबंधित आहे. PCOD स्त्रीबीज निर्मितीचं चक्रावर परिणाम होतं असतो.

महिलांना होणारा हा आजार बदलत्या जीवनशैलीमुळे होतो. मात्र याविषयी फारच कमीजणांना माहिती असते.

या आजारामुळे वजन वाढतं आणि चेहऱ्यावर केस येतात. मासिक पाळीवरही परिणाम होतो.

हार्मोनचं संतुलन बिघडल्याने हे आजार होतात. या आजारासाठी औषधं उपलब्ध आहेत मात्र खाण्यापिण्याच्या, झोपण्याच्या वेळेत नियमितता आणल्यास या आजाराचा धोका कमी होतो असं डॉक्टर सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)