पाहा व्हीडिओ : मुलीनं सुवर्ण पदक जिंकण्यासाठी आईनं घेतले 'हे' श्रम

जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या स्वप्ना बर्मन या खेळाडूनं हेप्टाथलॉनमध्ये सुवर्ण पदक जिंकून नवा इतिहास रचला. एशियन गेम्समधल्या हेप्टाथलॉनमध्ये भारताला पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळालं.

हेप्टाथलॉन या स्पर्धा प्रकारात एकूण सात खेळ असतात. 100 मीटर हर्डल, हाय जंप, गोळा फेक, लाँग जंप, 200 मीटर धावणे, भाला फेक, 800 मीटर धावणे यांचा समावेश होतो.

पश्चिम बंगालच्या जलपायगुडीमधल्या 21 वर्षांच्या स्वप्नाचा या पदकापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तिचे वडील रिक्षाचालक आहेत आणि तिची आई चहाच्या मळ्यात काम करते. त्यांचं काम संपल्यानंतर त्या स्वप्नाला सायकलवरून 13 किमी सरावासाठी नेत असत.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)