पाहा व्हीडिओ : कुत्र्यांप्रमाणेच मुंगूसही शोधू शकतात स्फोटकं
पाहा व्हीडिओ : कुत्र्यांप्रमाणेच मुंगूसही शोधू शकतात स्फोटकं
श्रीलंकेच्या लष्करानं दोन मुंगसांना स्फोटकं शोधण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. हे मुंगूस आता लष्कराच्या ताफ्यात भरती झाले आहेत.
स्निफर कुत्र्यांच्या तुलनेत मुंगूस अधिक प्रभावी असल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यांना वाटतं. मुंगसांची वास घेण्याची क्षमता जास्त असल्याचं मानलं जातं.
कोणतीही स्फोटकं ते शोधून काढतात. या बाबतीत कुत्र्यांपेक्षा त्यांची कामगिरी चांगली आहे. मुंगूसांना प्रशिक्षण देण्यासाठी सहा महिने लागतात. सैनिकांप्रमाणेच त्यांनाही स्वतःचा ओळख क्रमांक आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)