पाहा व्हीडिओ : मासिक पाळीत कुलूतील महिलांना गोठ्यात झोपावं लागतं

पाहा व्हीडिओ : मासिक पाळीत कुलूतील महिलांना गोठ्यात झोपावं लागतं

कुलूच्या डोंगराळ भागातील गावांमधल्या बऱ्याचशा महिला मासिक पाळी आल्यावर गोठ्यात झोपतात. हिमाचल प्रदेशच्या कुलूमधल्या जाना गावातली विमला देवी या एका मुलाची आई आहेत. त्या मासिक पाळी आल्यावर घरात पाऊल ठेवत नाहीत. मुलगा आणि नवऱ्यापासून वेगळ्या अशा घराखालील गोशाळेत त्या झोपतात.

"मी थंडीमध्येही गोशाळेत झोपते किंवा बाहेर झोपते. मी घरात जाऊ शकत नाही. किचनमध्येसुद्धा जाता येत नाही आणि मंदिरातही जाता येत नाही. कधी-कधी देवाला प्रश्न विचारते की माझ्या बाबतीत असं का होतं?" असं विमला सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)