पाहा व्हीडिओ : पैशाची गोष्ट- हे आहेत, महिलांना मिळणारे विशेष आर्थिक लाभ

महिला स्वातंत्र्याविषयी आपण बोलतो. पण महिलाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा. अनेकदा महिलांवर एकट्याने संसाराची किंवा पालकांची जबाबदारी उचलण्याची वेळ येते.

तर अलीकडेच प्रसिद्ध झालेला एक सॅलरी इंडेक्स सांगतो की, महिलांना पुरुषांच्या तुलनेत 20% कमी पगार मिळतो. अशावेळी बचतीचं महत्त्वं महिलांच्या दृष्टीनं आणखी वाढतं.

आपल्यापैंकी अनेक महिलांना हे माहितीचं नसतं की सेव्हिंग करताना महिलांना काही खास सुविधा आणि लाभ मिळतात. महिलांसाठी विशेष बँक खाती असतात आणि त्यावर वाढीव व्याजही दिलं जातं. असेच काही आर्थिक लाभ जाणून घेऊया पैशाची गोष्टमध्ये...

निवेदक - ऋजुता लुकतुके

लेखक - दिनेश उप्रेती

निर्माती - सुमिरन प्रीत कौर

एडिट - राजन पपनेजा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)