पाहा व्हीडिओ : शिक्षणासाठी विद्यार्थांची 12 किमींची जीवघेणी पायपीट

पाहा व्हीडिओ : शिक्षणासाठी विद्यार्थांची 12 किमींची जीवघेणी पायपीट

ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यामधील मैदे गावातल्या आदिवासी पाड्यावरच्या इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 12 किमींची पायपीट करावी लागते.

गावात शाळेची सोय नसल्यामुळे मुलं जीव धोक्यात घालून पिवळी गावातल्या शाळेत जातात. शाळेत येजा करण्यासाठी त्यांना रोज १२ किमी चालावं लागतं.

आम्हाला शाळेत जायचं आहे. त्यामुळे आम्ही चिखल-पाणी तुडवत कशीबशी शाळा गाठण्याचा प्रयत्न करतो, असं इथल्या मुली सांगतात.

साधारणतः 40-50 विद्यार्थी दररोज एवढा प्रवास करून शाळेत येतात.

शूटिंग - प्रशांत ननावरे

एडिटिंग - राहुल रणसुभे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)