फिशफूड गणपती - इको फ्रेंडली बाप्पा, जो जातो माशांच्या पोटात
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : फिशफूड गणपती - माशांच्या पोटात जाणारा बाप्पा

दरवर्षी गणेशोत्सव आला की इको फ्रेंडली गणपतीची मागणी धरली जाते. त्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली जाते. त्यातच आणखी एक म्हणजे फिशफूड गणपती.

गणपती बनवताना नैसर्गिक रंग वापरतात, शिवाय त्यात काही लोक माशांसाठी पिठाचे गोळे वगैरे भरतात. यातूनच पुढे आली ती फिश फूड गणेशाची कल्पना.

फिशफूड गणपती बनवण्यासाठी आधी शाडूच्या मातीचा गणपती साच्यातून बनवून मग त्या मूर्तीचे दागिने आणि कोरीवकाम केलं जातं. यानंतर मूर्तीला हळद, कुंकू, मुलतानी माती आणि गेरू असे नैसर्गिक रंग लावले जातात. हे रंग सुकल्यानंतर मूर्तीच्या पोटात फिश फूड भरतात आणि त्याला कागदानं खालून बंद केलं जातं. म्हणजे विसर्जन करताना फक्त कागद काढून त्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं, जेणेकरून मूर्ती विरघळताच त्यातलं फिश फूड माशांना खायला मिळतं.

व्हीडिओ - राहुल रणसुभे आणि प्रशांत ननावरे

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)