पैशाची गोष्ट - तेल आणि रुपयाचा शेअर बाजारावरही होतोय परिणाम
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पैशाची गोष्ट - शेअर बाजारातली घसरण थांबणार कधी?

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरत चाललेली किंमत, उसळलेलं कच्चं तेल यांचा परिणाम जगभरातल्या शेअर बाजारांवरही होतो आहे. मागच्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी हे भारतीय निर्देशांकही सपाटून आपटले.

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अर्थविषयक समितीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर बाजार थोडेफार सावरले.

अर्थात तज्ज्ञांच्या मते भारतीय अर्थव्यवस्थेची तब्येत ठणठणीत आहे. आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांबरोबरच परिस्थिती हळूहळू सुधारेल.

पैशाची गोष्टमध्ये जाणून घेऊया ही घसरण थांबणार कधी?

निवेदक - ऋजुता लुकतुके

लेखक - दिनेश उप्रेती

निर्माती - सुमिरन प्रीत कौर

एडिटिंग - राजन पपनेजा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)