गाझातील 'सार्वभौमत्वा'चं प्रतीक असलेलं विमानतळ उद्ध्वस्त
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्हीडिओ : गाझाचं हे भुताटकी विमानतळ जिथे 17 वर्षांपासून विमान आलं नाही

गाझातील यासर अराफत आंतरराष्ट्रीय विमानतळ 1998मध्ये 8.6 कोटी डॉलर खर्च करून उभारण्यात आलं होतं. पण 2001नंतर इथून एकाही विमानानं टेक ऑफ किंवा लँडिंग केलेलं नाही.

कारण 2000 ते 2005 या काळात ते उद्ध्वस्त करण्यात आलं. आणि आज तर भोवताली असलेल्या निर्वासितांच्या कॅम्पमुळे इथल्या धावपट्टीवर कचरा जमा झाला आहे.

एकेकाळी हे विमानतळ पॅलेस्टाईनच्या सार्वभौमत्वाचं प्रतीक होतं. मग आज याची अशी दैनावस्था का झाली?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)