गव्हाचं हे नवीन वाण जगाची वाढती भूक भागवेल?

जगात उत्पादित होणाऱ्या अन्नातून माणसं जेवढ्या कॅलरीज मिळतात, त्यातल्या 20 टक्के फक्त गव्हातून मिळतात. गहू जगातल्या सगळ्यांत महत्त्वाच्या पिकांपैकी एक आहे.

म्हणूनच ग्लोबल वॉर्मिंगच्या या काळात वाढत्या तापमानातही तग धरू शकेल अशा गव्हाच्या वाणाची गरज आहे. तर दुसरीकडे वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी 2050पर्यंत गव्हाचं उत्पादन 50% वाढण्याची गरज आहे.

या सगळ्या परिस्थितींची विचार करून गव्हाचं नवीन वाण शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांची एक टीम प्रयत्न करत आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)