पाहा व्हीडिओ : 'पाकिस्तानातल्या मराठमोळ्या पार्वती यांच्याकडे असा साजरा होतो गणेशोत्सव'

पाहा व्हीडिओ : 'पाकिस्तानातल्या मराठमोळ्या पार्वती यांच्याकडे असा साजरा होतो गणेशोत्सव'

पाकिस्तानातल्या कराचीमध्ये मराठी कुटुंब असून त्यांच्याकडेही गणेशोत्सव साजरा होतो. इथं राहणाऱ्या पार्वती यांच्या घरी दरवर्षी गणपतीचं आगमन होतं.

पार्वती यांच्याकडे गणपतीच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक आणि कानोले केले जातात. पार्वती यांचे कुटुंबीय मोरया - मोरयाच्या गजरात गणपतीचं विसर्जन करतात.

पार्वती यांनी कराचीमध्ये त्यांच्या घरी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाबाबतच्या खास गोष्टी बीबीसीकडे व्यक्त केल्या आहेत.

बीबीसी न्यूज मराठीसाठी पाकिस्तानहून शुमाईला जाफरी यांचा रिपोर्ट.

प्रोड्युसर - फरहान राफी

शूट आणि एडिट - फाकिर मुनिर

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)