'आसाममधले काही माजी सैनिक आता देशाचे नागरिक नाहीत?'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : आसाममधले काही माजी सैनिक आता देशाचे नागरिक नाहीत?

आसाममध्ये वास्तव्यास असलेल्या काही माजी सैनिकांना त्यांचं नागरिकत्व सुप्रीम कोर्टात सिद्ध करावं लागणार आहे.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अधिकृत नागरिकांच्या यादीत त्यांचं नाव नाही. सादुल्ला यांच्या सारख्या माजी सैनिकांनी कारगिल युद्धातही सहभाग घेतला होता.

देशाच्या संरक्षण दलात सहभागी होताना नागरिकांची सखोल चौकशी केली जाते. त्यामुळे संरक्षण दलात सहभागी झालेल्यांचं नागरिकत्व रद्द कसं होऊ शकतं? हा सवाल या माजी सैनिकांनी उपस्थित केला आहे.

बीबीसी न्यूजसाठी फैसल मोहम्मद यांचा रिपोर्ट.

शूट आणि एडीट - प्रितम रॉय.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)