दोन्ही हात गमावल्यावर ते चित्र काढायला शिकले
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ - दोन्ही हात गमावल्यानंतरही ते चित्रकार झाले

एका अपघातात दक्षिण कोरियाच्या सक जांग-वूंना यांना त्यांचे दोन्ही हात गमवावे लागले.

सक जांग वू आता नामांकित चित्रकार आहेत. "आता मला कुणी माझे हात परत देतो म्हटलं तर मी नको म्हणेण," असं ते सांगतात.

त्यांचा मुलगा अगदी लहान असतानाच सक यांना दोन्ही हात गमवावे लागले होते. त्यामुळे मुलासाठी काही करता येत नव्हतं, याची त्यांना खंत होती.

मुलाने एकदा चित्र काढायचा हट्ट केल्यावर त्यांनी पक्ष्याचं चित्र काढलं होतं. ते सगळ्यांना खूप आवडलं. त्यानंतर त्यांनी चित्र काढणं सुरू केलं.

"चित्रं काढणं आता मला आवडतं आणि मी समाधानी आहे," असं ते म्हणतात.

2014च्या हिवाळी पॅरालिंपिकमध्ये सक यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं.

"अपघातानंतर लोक भूतकाळात जगतात. पण अशा आठवणी विसरायला हव्या. परिस्थितीचा स्वीकार करत तिचा सामना केला पाहिजे," असं ते सांगतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)